भरारी! जितेंद्रजी कायस्थ विभागीय सचिव पदी!..
मराठी पत्रकार परिषदेच्या डिजीटल मिडीयाचा विस्तार..!झी 24 तास चे मयूर निकम जिल्हाध्यक्ष!

जितेंद्रजी कायस्थ म्हणाले…’पत्रकार व जनतेच्या न्यायासाठी कटीबद्ध राहील!’
बुलढाणा ( बुलढाणा ) मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेच्या विभागीय सचिव पदी पत्र महर्षी जितेंद्रजी कायस्थ यांची वर्णी लागली तर जिल्हाध्यक्षपदी मयूर निकम व सहसचिवांची जबाबदारी लॉर्ड बुद्धा चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी दीपक मोरे यांचेवर आली आहे.
‘पत्रकारिता’ ही विशिष्ट संज्ञा ज्या व्यवहार, वर्तन व कार्याचा बोध करून देते, त्या अर्थाचा व्यवहार मानवी संस्कृतीत फार अलीकडचा म्हणजे गेल्या दोन-अडीच शतकांतील आहे. तशीच अत्यंत जूनी संघटना म्हणून मराठी पत्रकार परिषद विख्यात आहे. पत्रकारांच्या समस्या असो की जनतेवर झालेला अन्याय? ही संघटना न्यायिक लढा देते.अशा मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेची काल जिल्हा पत्रकार भवन येथे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिलजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनात राज्यात डिजिटल मीडिया परिषदेची मुहूर्तमेढ रोवली. त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकाराने पार पडलेल्या बैठकीत बुलढाणा जिल्हा डिजिटल मीडियाच्या विभागीय सचिव पदी जितेंद्र कायस्थ तर बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी मयुर निकम, जिल्हा सरचिटणीस पदी दीपक मोरे, उपाध्यक्षपदी किशोर खंदारे तर घाटाखाली जिल्हाध्यक्षपदी श्रीधर ढगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर तथा मराठी पत्रकार परिषदेचे नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत, जिल्हा सरचिटणीस कासीम शेख, जिल्हा कार्याध्यक्ष वसीम शेख, तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डीडोळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डिजिटल मीडिया परिषदेच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हाभरातील युट्युब चॅनलचे संपादक पोर्टल चे संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या इतर कार्यकारणी पुढील दोन दिवसात घोषित करण्यात येणार असल्याची माहिती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पत्रकारांसाठीच नव्हे तर जनतेच्या न्यायासाठी तत्पर!
केवळ पत्रकारांनाच नव्हे तर जनतेला न्याय देण्यासाठी मी ठाम आहे. विभागीय सचिव पदाची जबाबदारी आल्याने डिजिटल मीडिया बळकट करण्यासाठी मी कार्यतत्पर राहील असा विश्वास, यावेळी जितेंद्रजी कायस्थ यांनी व्यक्त केला आहे.