Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईल येथे रोजगाराची संधी !

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत घरगुती सहाय्यक पदासाठी भरती

Spread the love

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील पुरुष व स्त्री उमेदवारांना, इस्त्राईल येथे घरगुती सहायक या कामासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलढाणा चे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या संधीचा लाभ घेण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे घरगुती सहायक सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील सक्षम प्राधिकरणाव्दारे नियामक मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाव्दारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सिंग/पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

नोकरीचे वर्णन व तपशील पुढीलप्रमाणे:

घरगुती सहायक पदाचे नाव असून त्यास किमान पात्रता १०वी उत्तीर्ण, अनुभव, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र काळजीवाहक सेवा प्रदान करण्यासाठी पात्र आणि भारतातील सक्षम नियामक प्राधिकरणाकडून जारी केलेले प्रमाणपत्रधारक असावा, जो 990 तासांच्या (OJT सहित) मान्यताप्राप्त किंवा संबंधित भारतीय अधिकाऱ्यांद्वारे पर्यवेक्षण केलेला, किंवा पूर्णत्व सिद्ध करणारा डिप्लोमा यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे दाखवणारे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स सहाय्यक, किंवा प्रसूतीशास्त्र प्रशिक्षण पूर्ण केलेला, ज्याच्याकडे संबंधित भारतीय प्राधिकरणांकडून डिप्लोमा मान्यताप्राप्त आहे. जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सींग/ पोस्ट  बीएससी नर्सींग,  इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे, पुरुष/स्त्री उमेदवार पात्र. उंची/वजन – किमान 5 फूट / 45 किलो किंवा अधिक. पासपोर्ट वैधता किमान 3 वर्षे. इतर आवश्यकता उमेदवाराने पूर्वी इस्त्राईलमध्ये काम केलेले नसावे. त्याचा/तिचा जोडीदार, पालक किंवा मुले इस्त्राईलमध्ये सध्या काम करत असू नयेत किंवा इस्त्राईल रहिवासी नसावा.

इस्त्राईल येथे नोकरी इच्छुक उमेदवारांनी www.maharashtrainternational.com या संकेतस्थळावर नोंदणी करून परदेशातील रोजगार संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत अथवा कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 07262-242342 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे  यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page