नविन फौजदारी कायदे कार्यशाळा पोलीस स्टेशन येथे संपन्न
आरोपी कोणत्याही समाजाचे नसतात ते फक्त आरोपीच असतात :- ठाणेदार अमरनाथ नागरे

डोणगांव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- महाराष्ट्र शासन गृह खात्याच्या सुचनेनुसार बुलढाणा जिल्हा पोलीस दल अंतर्गत डोणगांव पोलीस स्टेशनच्या वतीने दि 18 जानेवारी रोजी जनजागृती साठी नवीन फौजदारी कायदे कार्यशाळा संपन्न झाली ,या कार्यशाळेत आरोपी हे कोणत्याही एका समाजाचे नसतात ते आमच्यासाठी फक्त आरोपीच असतात,असे मत ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी व्यक्त केले, स्थानिक पोलीस स्टेशनच्या आवारात आयोजित या नविन फौजदारी कायदे कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी अँड विनोद नरवाडे, अँड यशवंत आखाडे तर माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर, सरपंच शिवचरण आखाडे, उपसरपंच शाम इंगळे,माजी सरपंच संजय आखाडे आदि उपस्थित होते,या कायदे विषयक कार्यशाळेला पोलीस पाटील, पत्रकार, शांतता समिती सदस्य व परिसरातील जेष्ठ मंडळी आवर्जून उपस्थित होती, सर्वप्रथम प्रमुख मार्गदर्शक यांचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करुन प्रास्ताविक मनोगतातून नविन फौजदारी कायदे संदर्भात भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 संदर्भात विस्तृत माहिती यावेळी दिली प्रमुख मार्गदर्शक अँड विनोद नरवाडे व अँड यशवंत आखाडे यांनी उपस्थित मंडळींना नविन फौजदारी कायदे संदर्भात बहुमोल मार्गदर्शनातून काळ बदलत गेला त्याच प्रमाणे कायद्यात सुधारणा करण्यात आली,या नविन कायद्या नुसार वीखुरलेल्या कायद्यांना एकसंघ करता आले,गुन्हा करण्याची नवीन नवी पध्दत समोर आली असुन त्याच प्रमाणे कायदे सुध्दा करण्यात आले आहे,जसा काळ बदला आहे तसे गुन्हयाचे स्वरुप बदले आहे त्यानुसार नविन कायदे अंमलात आणण्याची गरज होती,ती या नविन कायद्याच्या माध्यमातून पुर्ण झाली आहे,