सहकार विद्या मंदिरमध्ये सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस उत्साहात साजरा

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-सहकार विद्या मंदिर या सी.बी.एस.ई. मान्यता प्राप्त शाळेत राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मंगळवार दि.14/01/2025 रोजी सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सैन्यातील निवृत्त जवानांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाया सैनिकांचा सन्मान करणे, माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणे या हेतूने दरवर्षी विद्यालयात हा दिवस साजरा करण्यात येतो.कर्नल ओमेश शुक्ला, 13 महाराष्ट्र बटालियन, खामगांव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस साजरा करण्यात आला.यावेळी बुलढाणा अर्बन चॅरीटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ.कोमल झंवर, प्राचार्य, मुख्याध्यापीका, एन.सी.सी. ऑफीसर श्री.राजू हिवाळे व एन.सी.सी. कॅडेट यांच्या उपस्थितीमध्ये निवृत्त माजी सैनिकांच्या देशसेवेचा, राष्ट्रसेवेचा गौरव करण्यात आला.
यावेळी निवृत्त जवानांमध्ये हवालदार अनिल डोंगरदिवे यांनी उपस्थित कॅडेटला मोलाचे मार्गदर्शन केले व आपले देशसेवा करीत असतांनाचे अनुभव कॅडेटला सांगितले. माजी सुभेदार मेजर अजाबराव जाधव, हवालदार सिध्दार्थ मिसाळ, हवालदार विजय राऊत, हवालदार गुलाबराव मिसाळ आदी निवृत्त जवान उपस्थित होते.