प्रयागराज कुंभमेळ्यासाठी सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडयांना शेगाव येथे थांबा मिळावा ..केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली रेल्वेमंत्र्यांकडे मागणी …

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):- प्रयागराज येथील कुंभमेळाव्यासाठी सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडयांना शेगाव रेल्वे स्थानकावर ही थांबा मिळावा अशी मागणी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे
उत्तर प्रदेशातील प्रयाग राज येथे 13 जानेवारीपासून कुंभमेळाला सुरुवात झाली आहे बारा वर्षानंतर येणाऱ्या या कुंभमेळाव्यात देशभरातील भाविकांना सहभागी होता यावे यादृष्टीकोनातून केंद्र सरकारच्यावतीने विशेष रेल्वे गाड्या ही सोडण्यात आल्या आहे यामध्ये हुजूर साहेब नांदेड पटना कुंभमेळा एक्सप्रेस,,काचीगुडा पटना कुंभमेळा एक्सप्रेस आणि पटना सिकंदराबाद कुंभमेळा एक्सप्रेस ह्याचा समावेश आहे ह्या विशेष रेल्वे गाड्या माझ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून जात आहे परंतु या गाड्यांना शेगाव येथे थांबा नाही . संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ शेगाव येथे आहे संतनगरी शेगाव येथे देशभरातून लाखो भाविक येत असतात भक्तांची मांदियाळी या ठिकाणी दररोज दिसून येते कुंभमेळा विशेष रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा दिल्यास भक्तांना शेगाव येथील गजानन महाराजांच्या समाधीस्थळचे दर्शन घेण्याची संधी मिळेल आणि बुलढाणा जिल्ह्यातील भक्तांनाही प्रयागराज येथील कुंभमेळा येथे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल त्या दृष्टिकोनातून शेगाव रेल्वे स्टेशनवर उपरोक्त तिन्हीही कुंभमेळा विशेष रेल्वेला थांबा द्यावा अशी मागणी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे