रस्ता सुरक्षा जागृती अभियानात युवक-युवतींनी पथनाटयाच्या माध्यमातून सडक सुरक्षा नियम पाळण्याचे आवाहन केले

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलढाणा, राष्ट्रीय सेवा योजना, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फॉर्मसी, उपप्रादेशीक परिवहन कार्यालय बुलढाणा व वाहतूक शाखा, जिल्हा पोलिस दल,बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 19/01/2025 रोजी पथनाटयाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा बाबत जयस्तंभ चौक, बसस्टॅण्ड, व तहसील चौकात जागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. विजय बोरकर, नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक स्वप्नील कोल्हे, प्रतिक रोडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्नील नाईक, पोलिस उपनिरिक्षक विलास कड, पो.उपनिरिक्षक अनिल भुसारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पवन जगताप, प्रा. सुजित पाटील हे उपस्थित होते. हेलमेट वापरा, सीटबेल्टचा वापर करा, नशाकरुन वाहन चालवू नका, अपघात प्रसंगी जख्मीना मदत करा, रस्ता सुरक्षा नियम पाळा असा संदेश या पथनाटयामध्यून देण्यात आला. तर जख्मी व्यक्तीला एका तासाच्या आत रुग्णालयात दाखल केल्यास मदत करणा-या व्यक्तीला रोख पारितोषीक सुध्दा देण्यात येत असल्याचे सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक स्वप्नील कोल्हे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पवन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ पथनाटयाचे सादरीकरण केले. कार्यक्रमासाठी आकाश चाफेकर यांनी परिश्रम घेतले.