भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांची सदिच्छा भेट!
कायंदे परिवाराला समाजसेवेचा अध्यात्मिक वारसा:-शास्त्री

बुलडाणा(आपलं बुलढाणा जिल्हा बातमी)स्व. देवानंदभाऊ कायंदे यांना अध्यात्माची गोडी होती, सर्व समाजाला सोबत घेऊन सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात बंधूभाव निर्माण करण्याचे कामही देवानंदभाऊ यांनी केले.. तोच वसा व वारसा आमदार मनोज कायंदे व त्यांचे बंधू सतीश कायंदे यांच्यात उतरला असून, त्यांना मातोश्री नंदाताईंचे मार्गदर्शन असल्याने.. कायंदे परिवार समाजसेवेचा आध्यात्मिक वारसा पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत प.पू. नामदेव शास्त्री महाराज यांनी केले.
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गुरुवार १६ जानेवारी रोजी देऊळगावराजा येथे कायंदे परिवाराच्या निवासस्थानी शुभेच्छा भेट दिली, त्यावेळी त्यांनी संवाद साधताना कायदे परिवाराचे भरभरून कौतुक केले. देवानंदभाऊंच्या स्मृतींना उजाळा त्यांनी दिला तर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल मनोज कायदे यांचे कौतुक केले.कायदे परिवाराच्या प्रत्येक सुख दुःखात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी हजेरी लावली आहे. स्व. देवानंदभाऊ आणि नामदेव शास्त्री यांच्यात चांगली मैत्रीसुद्धा होती. एका आध्यात्मिक कार्यक्रमासाठी जात असताना नामदेवशास्त्री यांनी देऊळगावराजा येथे कायंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन या संपूर्ण परिवारासोबत खूप वेळ घालवला. अनेक जुन्या आठवणी, वर्तमान परिस्थिती व भविष्यात करावयाची कामे.. यावर बराचवेळ संवाद चालला. मनोजमध्ये असलेला संयम व त्याची शिस्त याचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी कायंदे परिवाराच्या वतीने शास्त्रीजींचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी आ. मनोज कायदे यांच्यासह नंदाताई कायंदे, सतीश व सौ. कल्पना कायंदे, सौ. वर्षाताई मनोज कायंदे, भगिनी सौ. सुरेखाताई मुंडे व कायंदे परिवारातील अन्य सदस्य तथा स्नेहीजन उपस्थित होते.
▪️पहिला पगार सत्कार्यासाठी..
मनोज कायंदे यांना आमदार म्हणून मिळालेला पहिला पगार त्यांनी, अध्यात्मिक सत्कार्यासाठी दिला. त्यांचे वडील देवानंदभाऊ कायंदे हे नेहमीच मंदिर व आश्रमात समाजसेवेसाठी दान देत. हीच सत्कार्यासाठी देण्याची परंपरा आ. मनोज कायंदे यांनी पुढे चालू ठेवली, हे येथे उल्लेखनीय!