नवीन 3 कायद्यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात कार्यशाळा संपन्न..
डी वाय एस पी सुधीर पाटील, अॅड सवडतकर , अॅड ए पी पी मॅडम, अॅड कस्तुरे मॅडम, यांनी उपस्थितांना नवीन कायद्यांचे मार्गदर्शन केले.

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):-17 जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय माहिती बाबत आज बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे नवीन 3 कायद्यान संदर्भात प्रसार व प्रसिद्धीसाठी SDPO सुधीर पाटील यांच्या अध्यक्ष खाली तर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे, मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली यावेळी माणसकावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कांबळे व चेंबर ऑफ कॉमर्स चे पदाधिकारी उपस्थित होते.
बुलढाणा शहर पोलीस स्टेशन व चेंबर ऑफ कॉमर्स बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या काही सीआरपीसी कायद्यांचे रूपांतरण भारतीय दंड संहिता मध्ये झाले असून यासंदर्भात जनतेत जनजागृती व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023,भारत साक्ष संहिता 2023 या तीन कलमान संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती प्रसिद्धी करण्यासाठ कार्यशाळेचे बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कांबळे यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्स पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक तसेच शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक यांना नवीन तीन कायद्यासंदर्भात जनजागृती पर डी वाय एस पी सुधीर पाटील, अॅड सवडतकर , अॅड ए पी पी मॅडम, अॅड कस्तुरे मॅडम, यांनी उपस्थितांना नवीन कायद्यांचे मार्गदर्शन केले.यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक वृंद मुख्याध्यापक, चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व सामान्य नागरिक यावेळी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी झाले होते