भुमीहीन शेतकऱ्यांचा लाँग मार्च: सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध…!
भुमीहीन शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघाला मुंबई मंत्रालय च्या दिशेने

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- भुमीहीन आणि वंचित शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनींसाठी लाँग मार्चचे आयोजन केले आहे. अनेक वर्षांपासून शासनाच्या ई-क्लास आणि वनजमिनी कसत असलेल्या या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासन निर्णय असतानाही महसूल अधिकाऱ्यांच्या लाल फितीमुळे जमीनपट्ट्यांच्या फाईली प्रलंबित राहिल्या आहेत.
भारतीय समता संघटनेचे अध्यक्ष आम्रपाल वाघमारे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी सौर प्रकल्पांसाठी हस्तांतरित करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, जे सामाजिक अन्याय आहे. भुमीहीनांच्या ताब्यातील जमिनीवर प्रकल्प लावल्यास त्यांना भिकेची वेळ येईल. या मागण्यांसाठी बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, परभणीसह इतर जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होणार आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022-2023 च्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना ताब्यातील जमीन पट्ट्याने देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, असा सवाल माजी जिल्हा सदस्य नरहरी गवई यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांनी लाँग मार्चद्वारे सरकारकडे आपल्या न्याय्य हक्कांसाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.भुमीहीन आणि वंचित शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनींसाठी लाँग मार्चचे आयोजन केले आहे.
अनेक वर्षांपासून शासनाच्या ई-क्लास आणि वनजमिनी कसत असलेल्या या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासन निर्णय असतानाही महसूल अधिकाऱ्यांच्या लाल फितीमुळे जमीनपट्ट्यांच्या फाईली प्रलंबित राहिल्या आहेत. भारतीय समता संघटनेचे अध्यक्ष आम्रपाल वाघमारे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी सौर प्रकल्पांसाठी हस्तांतरित करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, जे सामाजिक अन्याय आहे. भुमीहीनांच्या ताब्यातील जमिनीवर प्रकल्प लावल्यास त्यांना भिकेची वेळ येईल. या मागण्यांसाठी बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, परभणीसह इतर जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांनी लाँग मार्चद्वारे सरकारकडे आपल्या न्याय्य हक्कांसाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.