Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्यासोबत भूमिपुत्र ना.प्रतापराव जाधव यांचा संवाद: भारतीय परंपरेच्या शाश्वत ज्ञानावर भर

Spread the love

नवी दिल्ली (आपलं  बुलडाणा जिल्हा बातमी) भारतीय योग व अध्यात्माचे जगभरात प्रसार करणारे गुरुदेव श्री श्री रविशंकर आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची ऐतिहासिक भेट संपन्न झाली. या संवादामध्ये योग, ध्यान आणि भारतीय परंपरेच्या शाश्वत ज्ञानावर सखोल चर्चा करण्यात आली.

गुरुदेवांनी योग व ध्यानाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्य कसे प्राप्त करता येईल, यावर मार्गदर्शन केले. केंद्रीय मंत्री जाधव यांनी आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून भारतीय परंपरेचा जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार करण्यासाठी घेतलेली पावले मांडली.  या भेटीत भारतीय जीवनपद्धतीचे महत्व, योगाची विज्ञानाधिष्ठित मांडणी आणि त्याचे आरोग्यदायी परिणाम यावर भर देण्यात आला. केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला.   भारतीय परंपरा, संस्कृती आणि ध्यानाचा जागतिक आरोग्य क्षेत्रावर होणारा प्रभाव यावर केंद्रबिंदू ठेवून ही भेट ऐतिहासिक ठरली आहे. या चर्चेने भारतीय ज्ञानप्रवाहाला नवी दिशा मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page