वर्षभरापूर्वी चोरी गेलेले शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत तारा आठ दिवसांत ओढा अन्यथा कंपनी कार्यालयात ठेचा भाकर खाओ आंदोलनाचा भोजने यांचा इशारा…

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-रविंद्र गव्हाळे:- शेतकऱ्यांच्या शेतातून एक वर्षापूर्वी चोरी गेलेले तार तात्काळ ओढा अन्यथा म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता कार्यालयात शेतकऱ्यांसह ठेचा भाकर खाओ आंदोलनाचा शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांचा म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता आर. जि. तायडे यांना इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदुरा तालुक्यातील ग्राम येरळी येथील पंडितराव जगन्नाथ पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या गट नंबर 145 मधील शेतातील 11 पोलवरील विद्युत तार गेल्या एक वर्षांपूर्वी चोरीला गेले आहेत, ग्राम आमसरी येथील भगवान सुगदेव बावस्कर सुजातपूर गट नंबर 44 यांच्यासह 9 पोलवरील तार 6 महिन्यांपूर्वी चोरी गेले आहेत, समाधान बळीराम जामोदे निमगांव गट नंबर 608 यांच्या शेतापासुन संतोष देशमुख यांच्या शेतापर्यंत इतर शेतकऱ्यांच्या शेतातून 12 पोलवरील विद्युत तार ,काळे डि.पी पर्यंत चे 4 पोलवरील विद्युत तार गेलेले वर्षापासून चोरी गेले आहेत तसेच प्रशांत सुधाकर बाणाईत, मंगेश नायसे रा.कोळंबा, गट नंबर 105 यांच्या शेतातील 16 पोलवरील विद्युत तार एक वर्षापासून चोरी गेले आहे उपरोक्त शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीत पाणी असतानाही पिकांना पाणी देऊ शकत नसल्याने त्यांच्या शेती उत्पन्नात प्रचंड घट होवून त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे म.रा.वि वि कंपनीकडे लेखी,तोंडी तक्रारी करून सुद्धा तार ओढत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी आज याबाबतची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांना देताच त्यांनी शेतकऱ्यांसह मलकापूर येथील कार्यकारी अभियंता आर.जि.तायडे यांचे कार्यालय गाठले आठ दिवसात संबंधित शेतकऱ्यांना तार ओढून न दिल्यास म.रा.वि.वि कंपनी कार्यालयातच शेतकऱ्यांसह ठेचा भाकर खाओ आंदोलनाचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी दिला, यावेळी त्यांचे सोबत मलकापूर शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर,पंडीतराव पाटील,संजय जामोदे सह शेतकरी उपस्थित होते.