Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

भुमराळा – किनगाव जट्टू मार्गावर खड्यांचे साम्राज्य ग्रामस्थ शेतकरी विद्यार्थ्यांचे हाल सुरुच 

विद्यमान आमदारांकडून वाढल्या अपेक्षा....

Spread the love

लोणार:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी(राहुल सरदार):-सिंदखेडराजा मतदार संघातील शेवटच्या टोकावर असलेल्या व लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जटटू या मुख्य भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे गेल्या तीन वर्षांपासून भुमराळा किनगाव जटटू मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या नशिबी अजूनही भोग सुरुच आहे या मार्गावर ये जा करणारे वाहन चालक,शेतकरी, विद्यार्थी, अक्षरशा त्रस्त झाले आहे आज घडीला हा मार्ग विद्यार्थ्यांसाठी व वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे

भुमराळा येथुन हा मार्ग मुख्य मार्ग व जागतिक लोणार सरोवर ते संभाजीनगर मार्गाला जोडल्या गेला असुन या मार्गाने गावकरी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थांची मोठी वर्दळ असते परंतु मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असून गिट्टी उघडली असल्याने मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे रात्री खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनधारकांचे अनेक अपघात होत आहेत वाहने चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते अशा दुरवस्था झालेल्या मार्गाकडे माजी लोकप्रतिनिधींनी सतत दुर्लक्ष केले असून विद्यमान लोकप्रतिनिधींकडुन वाहनधारकांच्या अपेक्षा वाढल्या असुन संबंधित विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी भुमराळा ते किनगाव जटटू रस्त्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे शासनाने निधीची तरतूद करून डांबरीकरणाचे काम पूर्ण करून द्यावे अशी मागणी वाहनधारक, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूरांकडून होत आहे

 

भुमराळा गावानजीक एक किलोमीटर पर्यंत घाट रस्ता असुन त्या घाटातील डांबरीकरण पुर्णपणे उखडून गेले आहे त्यामुळे अनेक मालवाहू गाड्या, मोटारसायकल, एसटी बस, रुग्णवाहिका सह सर्वच वाहनधारकांना या घाटातून वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते आहे अनेक वेळा या घाटात अपघात सुद्धा झाले असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे देऊळगाव राजा येथील इंजिनिअर यांना याबाबत माहिती दिली असून मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांना भेटून सर्व समस्या मांडणार असुन आमदार आमच्या समस्या सोडवतील असा विश्वास भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांनी व्यक्त केला….

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page