Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
अमृत भारत योजना अंतर्गत मलकापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा…

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- आज भुसावळ येथील डीआरएम सुनिल कुमार सुमन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या सविस्तर चर्चेत, मलकापूर स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सरकता जिना (एस्केलेटर) बसवण्याची मागणी करण्यात आली. या चर्चेत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, ज्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याची आशा आहे.
आमदार चैनुसूख संचेती यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यासाठी आणि स्थानकाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्वपूर्ण मुद्दे मांडण्यात आले.प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक संघटनांची एकत्रित मेहनत निश्चितच एक आदर्श निर्माण करेल.यावेळी जिल्हा प्रवासी संघाचे अध्यक्ष श्री. महेंद्र बुरड उपस्थित होते.