Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

25 जानेवारीला मॉडेल डिग्री येथे मराठी भाषा पंधरवडा निमित्य मार्गदर्शन शिबीराचे आयोजन…

Spread the love

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):-मराठी भाषा विभाग आणि मॉडेल डिग्री कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 25 जानेवारीला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 36 जिल्हे 36 मार्गदर्शन सत्रेअंतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्याच्या दृष्टिकोनातून मराठी भाषा विभागाच्या वतीने राज्यभर 36 जिल्हे 36 मार्गदर्शन सत्रे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे बुलढाणा येथे हे सत्र आयोजित करण्याचा बहुमान बुलडाणा येथे मॉडेल डिग्री कॉलेजला मिळाला आहे त्यांनिमित्य एका कार्यक्रमाचे आयोजन 25 जानेवारीला करण्यात आले आहे या कार्यक्रमा दरम्यान मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी या विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यिक व मराठी भाषेची अभ्यासक रमेश इंगळे उत्रादकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक प्राचार्य डॉ अण्णासाहेब म्हळसने उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी आणि साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असं आवाहन मराठी भाषा विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर भाषा संचालक विजया डोनीकर , मॉडेल डिग्री कॉलेज येथील मराठी विभागाचे भ प्राध्यापक डॉ किं वा वाघ आणि डॉ मनीषा राऊत यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page