जिल्ह्यात ५० ठिकाणी फळ व शैक्षणिक साहित्याचे वाटप…
बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांचे आयोजन...

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी जिल्ह्यात ५० ठिकाणी फळ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सकाळी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तर राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या मुख्यालयी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शिवसेना नेत्या जयश्रीताई शेळके, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, उप तालुकाप्रमुख ओमप्रकाश नाटेकर, किसानसेनेचे उपतालुका प्रमुख एकनाथ कोरडे, आशिष खरात, राहुल जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच खामगाव जिल्हा सामान्य रुग्णालय, चिखली, मेहकर, मलकापूर, शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालय, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय तर धाड, उदयनगर, देऊळगाव मही, पिंपळगाव काळे, जानेफळ, साखरखेर्डा, सुलतानपूर, बीबी, धामणगाव बढे, सोनाळा, वरवट बकाल, अमडापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यासह पळसखेड सपकाळ येथील सेवासंकल्प प्रतिष्ठान, मूकबधिर विद्यालय, बुलढाणा येथे फळवाटप करण्यात आले. मोताळा तालुक्यातील चावरदा येथील कुष्ठरोग धाममधील रुग्णांना भोजन देण्यात आले.
माळविहिर, शिरपूर, सावळा, पोखरी, भादोला, पिंपरखेड, वरवंड, डोंगरखंडाळा, सव, रुईखेड टेकाळे, खेर्डी, येळगाव, नांद्राकोळी, अजीसपूर, साखळी येथील जिल्हा परिषद शाळा आणि बुलढाणा येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.