हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची वक्तृत्वशैली, नेतृत्व, आणि विचारांची शिकवण आजही मार्गदर्शक ठरत आहे …. शिवसेना नेते केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ज्वलंत वक्तृत्वशैली, कार्यक्षम नेतृत्व, दृढनिश्चय आणि महाराष्ट्रासाठीची निष्ठा लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या विचारांची शिकवण आणि योगदान आजही मार्गदर्शक ठरत आहे असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले
हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबई येथील पक्ष कार्यालय येथील वंदनीय बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक चळवळ होते. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी सुरू केलेल्या शिवसेना या चळवळीने सामान्य लोकांना आवाज दिला आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडली. त्यांच्या नेतृत्वाने सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ उभारली, ज्याचा प्रभाव आजही कायम असल्याचे मत शिवसेना नेते तथा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलले पक्ष कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमाला शिवसेना नेते आनंदरावजी अडसूळ दादाजी भुसे तानाजी सावंत नीलम गोऱ्हे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य शिवसैनिक उपस्थित होते तर सकाळीच केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुंबईतील कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जनसंपर्क कार्यालत शिवसैनिकांनी केली अभिवादन …
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा येथील जनसंपर्क कार्यालयातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुष्पमाल्य अर्पण करून शिवसैनिकांनी अभिवादन केले यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख गजेंद्र दांदडे बाळू घुड माजी नगराध्यक्ष विठ्ठल येवले माजी नगरसेवक दीपक सोनुने मनोज यादव निलेश राठोड सुभाष पवार तुषार सावजी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते