डोणगाव शहर व ग्रामीण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या रक्तदान शिबिरात २०७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

मेहकर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-ज़ैनुल आबेद्दीन:-डोणगाव शहर व ग्रामीण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवार २४ जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट ऑर्गनायझेशन व महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून जगन्नाथ (आप्पासाहेब) शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .एकाच दिवशी ७५ हजार पेक्षा जास्त रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून देशातील व राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने या उपक्रमात डोणगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान २०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले .केमिस्ट असोसिएशन सेवाभावाने नेहमीच विविध उपक्रम राबवीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी डोणगावचे सरपंच शिवचरण आखाडे यांनी फित कापून रक्तदानं शिबिरास सुरुवात केली प्रमुख उपस्थिती माजी सभापती राजेंद्र पळसकर डॉक्टर गजानन उल्हामाले ,माजी सरपंच संजय आखाडे,ठाणेदार अमरनाथ नागरे पत्रकार बंधू तसेच डोणगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.