पांगरखेड येथील अवैध धंदे बंद करा. पांगरखेड ग्रामपंचायतचा ठराव व पोलीस स्टेशन ला निवेदन…

मेहकर :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- तालुक्यात सध्या डोणगांव सह ग्रामीण भागात अवैध धंद्यात वाढ झाली आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आदर्श ग्रामपंचायत असलेल्या पांगरखेड येथे सुरू असलेल्या अवैध वरली मटका. दारु चक्री यावर कारवाई करुन सर्व अवैध धंदे गावातून बंद व्हावे म्हणून ग्रामपंचायत चा ठराव संमत करुन डोणगांव पोलीस स्टेशन ला दि. 26 सप्टेंबर ला पांगरखेड चे सरपंच सुधाकर धंदरे ग्रामसेवक सागर काळे गोपाल पाखरे सह ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. सदर पांगरखेड गाव हे विविध पुरस्कार प्राप्त असून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे आणी याच गावात व पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावात अवैध धंदे सुरू झाले असल्याने सदर धंदे बंद करुन कारवाई करणे गरजेचे आहे.