मेहकर बस आगाराच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या नवीन १० लालपरी…

मेहकर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- २३ जानेवारी २०२५ हा दिवस मेहकर आगारासाठी अतिशय चांगला दिवस ठरला.१० लालपरी बसेस मेहकर आगाराच्या ताफ्यात सामील झाल्या. मेहकर आगार क्षेत्रात दाखल होताच, मातृतीर्थ जिजाऊ नगरी सिंदखेडराजामध्ये सर्व बसेसचे स्वागत तथा पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रथम प्रवासी जी के देशमुख, त्यांच्यासोबत सहप्रवासी अमित चाकोते, शेषराव दाभाडे, ओम पवार, निवास घुगे, शाम देशमुख शारदाताई देशमुख, सत्तार भाई हस्ते तथा सिंदखेडराजाचे वाहतूक नियंत्रक पवार साहेब यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये बसेसचे पूजन तथा स्वागत करण्यात आले. याप्रसंगी चालक महेश घुगे, निलेश लंबे, अमोल लोढे, परमेश्वर पवार,शिवा जाधव, रामभाऊ सवडतकर, एस आर राठोड, के पी भालेराव, राम शिनगारे, निवृत्ती नालींदे, आणि एकमेव वाहक प्रतिनिधी हारून पठाण हे प्रामुख्याने उपस्थित होते. नवीन बसेस आल्यामुळे प्रवासी अतिशय आनंदात आणि खुश होते एकमेकांना नवीन बस, नवीन बस असे म्हणत होते.
मेहकर आगारांतर्गत मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा इत्यादी तालुके जोडलेले असल्यामुळे आणखीही नवीन बसेसची मागणी प्रवाशांमधून होते आहे.बसेसच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे आणि अत्याधुनिक यंत्रणेमुळे चालक आणि वाहक वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
चालक वाहकांचे मनोगत
आज आम्ही अतिशय आनंदी आहोत. अनेक बाबींचे श्रम कमी होऊन, सुरक्षितता वाढलेली आहे.”
परमेश्वर पवार -चालक
“आम्ही आमची हक्काची सुट्टी सोडून, बसेस आणण्यासाठी पुणे येथे गेलो, आम्ही खूप आनंदात आहोत.”
महेश घुगे – चालक
“अल्प दरात उच्च सुविधा असलेली बस, प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झालेली आहे. समोरच्या व मागील सीटला सीट बेल्ट असल्यामुळे सुरक्षितता वाढलेली आहे”
हारुण पठाण – वाहक
नवीन बसमध्ये पहिला प्रवासी होण्याचा मान मिळाला, त्याचे मी भाग्य समजतो. नवीन बसेसमध्ये नवनवीन यंत्रणांचा वापर केल्यामुळे चालक, वाहक आणि प्रवाशांसाठी सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विवाह सोहळे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली, तीर्थदर्शन योजना, विशेष प्रासंगिक कार्यक्रमांसाठी आता नवीन बसेसमुळे प्रवाशांसाठी खुशखबर मिळते आहे, त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा अशी विनंती याप्रसंगी करतो.- जी के देशमुख*- प्रथम प्रवासी
सहप्रवासी अमित चाकोते, शेषराव दाभाडे…
खूपच सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण बस”
अमित चाकोते -प्रवासी
बसची महत्त्वाची वैशिष्ट्ये
41 सीटर ,80 चा स्पीड ,सीटला पुशबॅक सिस्टम ,यूएसबी चार्जिंग पॉइंट (नाईट ब्लिंकिंग), एअर सस्पेन्शन गेट ,ऍडजेस्टेबल स्टेरिंग ,फोर व्हीलर व्हेईकल टाईप सिस्टम ,सनरूफ सिस्टम,ड्रायव्हरसाठी बॅक कॅमेरा सिस्टम ,इमर्जन्सी अलार्म सिस्टम, इमर्जन्सी ब्लूटूथ सिस्टम ,अनाउन्स सिस्टम (घोषणा करण्याची सुविधा) ,साध्या प्रवासी भाड्यात चालणारी बस,इमर्जन्सी हॅमर ,अग्निशमन यंत्रणा,नाईट विजन डॅशबोर्ड ,पब्लिकने दिलेल्या लालपरी नावाचे अधिकृत स्टिकर,उत्कृष्ट कॉलिटीचे कुशन सीट, ब्रॉड विंडो ग्लास ,बॅग हुक ,वॉटर बॉटल कॅरियर