Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

चांडोळच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेत विज्ञान व कला साहित्य प्रदर्शन उत्साहात साजरा…

Spread the love

धाड:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-सलमान नसीम अत्तार :- बुलढाणा जिह्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळेत विज्ञान साहित्य व कला साहित्य पदर्शन साजरा करण्यात आला. विज्ञान साहित्य प्रदर्शनात पहिला क्रमांक. अरहान इम्रान पठाण याचा तर दुसऱ्या क्रमांकावर जकरिया मुदस्सीर खान यांनी पटकावला.

तर कला साहित्य पदर्शनात पहिला क्रमांक. जिनत व दुसरा क्रमांक शेख जकरिया यांनी पटकावला. या विज्ञान आणि कला साहित्य प्रदर्शनात एकूण 75/80विध्यार्थ्यानी सहभाग घेतला होता प्रत्येक विध्यार्थ्यानी स्वतः व पालकांच्या मदतीनी सर्व साहित्य चांगले बनवले होते. यात 5 क्लास मधून बिलाल सय्यद अजीम यांनी चांद्रयान 3 बनून त्याला इंजेकशन व सलाईन नळी च्या मदतीनी हवा भरून आकाशात भरारी कसा घेतो हे करून दाखवले व प्रत्येक विध्यार्थीने बनवलेले साहित्य व त्यांचे फायदे सांगून सर्वांचे लक्ष केंद्रित केले.

या विज्ञान व कला साहित्य प्रदर्शनात सर्व शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवून विधा्र्थ्यांचे मनोबल वाढवले.या कला व विज्ञान साहित्य संमेलनात गावाकऱ्यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला व सर्व विध्यार्थीचे मनोबल वाढवले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page