आपल्या घराचा स्वर्ग करायचा की नर्क करायचा ही शक्ती स्त्रीमध्ये-ह भ प सास्ते महाराज

चांडोळ: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- आपल्या हयातीमध्ये घरामध्ये आनंदी वातावरण ठेवून व सगळ्यांना खुश ठेवून स्वर्ग करायचा की वातावरण दूषित करून नर्क करायचा ही शक्ती फक्त नारीशक्तीमध्ये आहे.मनात अहंकार व द्वेष भावना मनामध्ये आणुन घरात दूषित वातावरण जीवन जगत असताना बघायला मिळत आहे. यासाठी ज्याची त्याची वागण्याची पद्धत त्याला कारणीभूत ठरू शकते.काल विदर्भ मराठवाड्याच्या धरतीवर सुरू असलेल्या फिरती चतुर्थी उपक्रमामध्ये धाड येथे आयोजित किर्तन प्रसंगी महाराज बोलत होते.महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या
लेकुराचे हित ।
पाहे माऊलीचे चित्त ।।१।।
ऐसी कळवळ्याची जाती ।
करी लाभाविण प्रिती ।।२।।
पोटी भार वाहे ।
त्याचे सर्वस्वही साहे ।।३।।
तुका म्हणे माझे ।
तुम्हा संतावरी ओझे ।।४।।
या अभंगावर निरूपण करताना आई नेहमी आपले लेकराचे ज्यामध्ये हित आहे तेच संस्कार देत असते आणि जगामध्ये आपल्यावर माया व स्वतःच्या जीवापेक्षा ही जीव लावणारे एकमेव पात्र म्हणजे आईचे असून आपल्या बालपणामध्ये स्वतःच्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस आपल्याला लहानाचं मोठं करते व आपल्यासाठी नको तो अंतपणाचा त्रास सहन करते ती फक्त आणि फक्त ‘आई’ असते आणि आईने सहन केलेला त्रास आपण सुद्धा त्या ठिकाणी सहन करू शकत नाही आणि आज कालच्या जीवनामध्ये तर वागण्या-जगण्याची पद्धत खूप बदलली असून मुलं आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करीत असतानांचे चित्र समाजामध्ये फिरताना दिसून येत आहे जगामध्ये सर्व काही करा पण आपल्या आई-वडिलांना त्रास होईल असे जीवन जगू नका असा मौलिक व आजच्या समाजातील बघायला मिळत असल्याचे बघायला मिळते. अभंगाला व समाजातील चालू घडामोडीला अनुसरून महाराजांनी संदेश दिला.आपल्या आईने दिलेल्या संस्काराने सर्व काही सुरळीत चालते त्याचेच ओझे हे संतावर होते आणि संत नेहमी चांगल्या मार्गावर चालण्याचे आपल्या अध्यात्माच्या माध्यमातून शिक्षण देत असतात.धाड येथील उबंटू ग्रुप यांच्या वतीने कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी परिसरातील किर्तनकार गायक वादक व इतर महाराज मंडळी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.