मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-राज्याचे मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हे शनिवार, रविवार दि. 25 व 26 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार शनिवार दि. 25 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 11.45 वाजता सिंदखेडराज येथे आगमन व जिजाऊ मॉ साहेब जन्मस्थळी अभिवादन आणि जिजाऊ सृष्टीस भेट. दुपारी 12.15 वाजता ॲड. नाझेर काझी(जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांच्या निवासस्थानी भेट आणि राखीव. दुपारी 12.45 वाजता देऊळगाव राजाकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता देऊळगाव राजा येथे आगमन व आमदार मनोज कायंदे यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 1.45 वाजता बुलढाणाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव.
रविवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.10 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथून पोलिस कवायत मैदानाकडे प्रयाण व सकाळी 9.15 वाजता शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, बुलढाणाकडे प्रयाण व राखीव. दुपारी 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बुलढाणा पक्ष कार्यालय येथील बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता बुलढाणा येथून शेगांवकडे(संत नगरी) प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शेगांव येथे आगमन व श्री संत गजानन महाराज दर्शन. दुपारी 3 वाजता मुंबईकडे प्रयाण.