Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

तो अल्पवयीन मुलीला छत्तीसगड येथे पळवून नेत होता पण त्यांनी तिला वाचविले…

Spread the love

शेगाव ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटना वारंवार घडताहेत.. अनेक ‘सैराट’ प्रकरणे ताजे असतांना, शेगाव आरपीएफ पोलिसांनी एक युवक अल्पवयीन मुलीला सुरत वरून छत्तीसगड येथे रेल्वेने पळवून नेत असतांना दोघांनाही ताब्यात घेऊन गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

 

घटना अशी की, 22 जानेवारीला 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी एका युवकासोबत अजमेरपुरी एक्सप्रेसने पळून जात आहे व ट्रेन मलकापूर वरून निघून गेल्याची सूचना सुरत पोलीस ठाण्यातून निरीक्षक मलकापूर एस एस हरणे यांना दिली.यावरून स उ नि प्रवीण भरणे, प्रधान आरक्षक रंजन तेलंग, आरक्षक समाधान गवई यांच्या टीम ने ट्रेन येण्यापूर्वी सापळा रचून ट्रेन येताच शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. अधिक शहानिशा केली असता सदर युवक अल्पवयीन मुलीला छत्तीसगड येथे घेऊन जात असल्याचे समजले. याची माहिती गुजरात पोलिसांना कळविण्यात आली असता, गुजरात पोलिसांची एक टीम सुरत पोलीस चे एएसआय योगेश भाई रतन पाटील,महिला कांस्टेबल-पीनल बेन आणि आरक्षक एम आर चौधरी हे सुरत वरून रवाना होऊन शेगाव येथे पोहचले.दरम्यान कायदेशीर कारवाई करून अल्पवयीन मुलीला व युवकाला ताब्यात घेऊन गुजरातला रवाना झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page