शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा येथे नवनिर्मित स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा या संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर कैलास झिने सर तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री डॉक्टर प्रशांत पाटील सर यांच्या हस्ते अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कैलास झिने सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर कैलास झीने सर यांनी आपल्या मनोगतात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यापासून महाविद्यालय सुस्थितीत चालू होईपर्यंतचा प्रवास सांगितला त्यामधे सर्वांची झालेली मदत आणि त्याचे महत्त्व सांगितले तसेच आपली संस्था रुग्णांना अधिक चांगल्या पध्दतीने कशी सेवा देऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तसेच सूत्रसंचालन श्री राजू काटोले यांनी केले. यावेळी डॉ.मेहेर, डॉक्टर दिपाली कोथळकर , डॉक्टर अर्चना टेकाळे, डॉक्टर प्रिया भुजे, डॉक्टर प्राची तायडे, डॉक्टर पूजा निकस श्री सोमनाथ माठे, प्रशासकीय अधिकारी, संतोष बुंधे व्यवस्थपक यांच्यासह शहरातील वैद्यकीय प्रतिष्ठित नागरिक, परिचारिका,महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी एमबीबीएस प्रथम वर्ष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमामध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीत गायले व शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री राहुल जाधव, श्री प्रमोद भोपळे, योगेश बघे,श्री सुरेश बेंडवाल,शेख कदिर,श्री गजानन भोरकडे,श्री अविनाश हिवाळे यांनी परिश्रम घेतले.