त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्सवास प्रारंभ…

बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- दरवर्षीप्रमाणे समस्त उपासिका संघ बुलढाणा व दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमान राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
उपासीका संघाच्या पुढाकारातून या कार्यक्रमाला आज दि.26 जानेवारी 2025 रोजी सावित्रीबाई फुले नगर येथील बुद्ध विहारांमध्ये रांगोळी स्पर्धा व महिलांसाठी गीत गायन स्पर्धेने या उत्साहात प्रारंभ झाला.
शुक्रवार दि.7 फेब्रुवारी 2025 रोजी माता रमाई यांच्या 127 व्या जयंतीच्या निमित्ताने सकाळी 11 वाजता लुंबिनी नगर बुद्ध विहार लुंबिनी नगर सुंदरखेड बुलढाणा येथे सकाळी 11 वाजता संगीत खुर्ची व दुपारी 12 वाजता वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
व सायंकाळी 7 वाजता गांधी भवन जयस्तंभ चौक बुलढाणा येथे बक्षीस वितरण समारंभ व प्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळे यांच्या रमाईंच्या जीवनावर आधारित गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमासाठी समस्त उपासिका संघ बुलढाणा या परिश्रम घेत आहेत.