Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न….

Spread the love

बुलढाणा:- आपल बुलढाणा जिल्हा बातमी: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा फुटबॉल संघटना बुलढाणा यांच्या संयुक्त  विद्यमाने जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा शारदा ज्ञानपीठ विद्यालय बुलढाणा येथे दि.26 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते.  यावेळी विजेता खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये 10 संघानी सहभागी झाले होते. सामने साखळी बाद पध्दतीने खेळविले गेले. वयोगट 13 वर्षा आतील मुलांसाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रथमच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमध्ये एकूण 21 सामने खेळविण्यात आले. प्रत्येक सामन्यामधून उत्कृष्ठ खेळाडूंचे पारीतोषिक देण्यात आले. प्रथम चार संघाना चषक व रोख पारीतोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये मलकापूर संघाने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करीत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. शारदा ज्ञानपीठ विद्यालयाने द्वितीय क्रमांक तर शारदा ज्ञानपीठ संघ “ब”, बुलढाणा यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. पोदार इंटरनॅशल स्कूल, बुलढाणा यांनी चर्तुथ क्रमांक प्राप्त केला. तसेच पुर्ण स्पर्धेमधून उत्कृष्ठ गोलकिपर आरव राणे, उत्कृष्ठ डिफेन्डर गगन जाजू, उत्कृष्ठ मीड फिल्डर सोहम जावरे, उत्कृष्ठ फॉर्वड रुद्र गौतम व बेस्ट प्लेअर ऑफ द टुरनामेन्ट सोहम सौंडलकर यांनी वैयक्तीक पारीतोषीक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच म्हणून अर्जुन दांडगे, ओम बनसोडकर, प्रेम सोनुने, गजानन हिरे व ओम हिवाळे यांनी कामकाज बघितले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख अतिथी जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, शारदा ज्ञानपीठचे अध्यक्ष डॉ. देशपांडे, जिल्हा फुटबॉल संघटनाचे अध्यक्ष एस.एस.ठाकरे, सरचिटणीस एन. आर.वानखेडे उपस्थित होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व जिल्हा फुटबॉल संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच मुकेश बाफणा, डॉ जीवन मोहोड, मनोज श्रीनीवास यांनी परिश्रम घेऊन यशस्वी आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page