समाजसेवक राजेश हेलगे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज सामाजिक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित…

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलडाणा येथील सुप्रसिध्द हॉटेल कृष्णा रेसिडेन्सीचे चालक मालक राजेश हेलगे यांना संत श्री तुकराम महाराज सामाजिक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर समारंभ संकल्प गार्डन आळंदी-पुणे रोड वडमुखवाडी पुणे येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आला होता. विदर्भ कुणबी मराठा समाज मंडळ भोसरी पुणे द्वारा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते माजी मंत्री आ. संजय कुटे यांच्या हस्ते राजेश हेलगे यांना गौरवांकित करण्यात आले. तर प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे आ. महेशदादा लांडगे, विदर्भ कुणबी मराठा समाज पुणे चे अध्यक्ष चांगदेव कळसकार, महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा समाज समन्वय अनंतराव भारसाकळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. राजेश हेलगे हे एक यशस्वी उद्योजक असून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहिलेले आहेत. त्यांनी 90च्या दशकात राजमाता जिजाऊ सांस्कृतिक क्रीडा मंडळ स्थापन केले असून या अंतर्गत व्यायाम शाळा, तरूणांना सैन्य भरती बाबत मार्गदर्शन शिबिरे,पोलीस भरती शिबीरे, शिवचरित्र व्याख्यानमाला असे विविध कार्यक्रम त्यांनी स्वतः राबविले आहेत. बुलडाणा शहरात पारंपरिक शिवजयंती उत्सव सुरू करण्याचे श्रेय राजेश हेलगे यांचेच आहे हत्ती,घोडे,पालखी, मोर, शिवराय, मावळे यांच्या वेशभूषा भव्य दिव्य शोभायात्रा ते मानकरी आहेत सार्वजनिक शिवजयंती उत्सवात सर्व पक्षाचे व जातीधर्माचे समाज बांधव एकत्र येण्याचा मुख्य भूमिका त्याची विशेष म्हणजे जगातील सर्वात उंच शिवस्मारक बुलडाणा शहरात असून त्यांचे उपाध्यक्ष तथा मुळ संकल्पना राजेश हेलगे यांचीच होती. पंढरपूर वारी करणाऱ्या वारकरी बांधवांसाठी हॉटेल कृष्णा रेसिडेन्सीमध्ये स्नानासह भोजनदान देण्याची त्यांनी सुरू केलेली परंपरा आजतागायत सुरू आहे. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना सतत मदतीचा हात देत त्यांना मार्गदर्शन अशा विविध शिवकार्यात राजेश हेलगे अग्रेसर असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज सामाजिक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याचे श्रेय ते शिवभक्तांना देतात