प्रा. प्रफुल खंडारे यांना राज्यस्तरीय मूकनायक पत्रकारिता पुरस्कार प्रदान !..

शेगाव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रा. प्रफुल खंडारे यांना राज्यस्तरीय मूकनायक पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शेगाव येथे नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम अंतर्गत आंबेडकरी वाईस ऑफ मीडिया फोरमच्या वतीने आयोजित मूकनायक पत्रकार दिन आणि संविधान अमृत महोत्सव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 कार्यक्रमात शिवांश सेलिब्रेशन शेगाव येथे आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमचे अध्यक्ष उत्तम वानखडे, जागतिक कीर्तीचे बुद्ध धम्म प्रचारक गगन मलिक ए व्ही एम एफ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रा. प्रफुल खंडारे यांना प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज्यभरातून मोठ्या संख्येत पत्रकार बांधव भगिनी सहभागी झाले होते.