Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

बुलडाणा जिल्ह्यांतील 64 हजार कुटुंबांचे होणार घरकुलांचे स्वप्न साकार…

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अथक प्रयत्नाना यश....

Spread the love

बुलडाणा:आपल बुलढाणा जिल्हा बातमी:- केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बुलडाणा जिल्ह्याला सन 2025 – 26 साठी 64155 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे त्यामुळे जिल्ह्यातील 64 हजार कुटुंबाच्या घरकुलांचे स्वप्न साकार होणार आहे.

प्रत्येकाला आपलं सुंदर असं घर असावं अशी मनोमन इच्छा असते परंतु आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना घराच स्वप्न साकारल्या जात नाही . पण अश्या गरजूना केंद्र सरकारच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिल्या जाते .यामध्ये बुलडाणा तालुक्यासाठी 4651, मोताळा 4227, चिखली 8213, मेहकर 8208, लोणार 3596, सिंदखेड राजा 6252, देऊळगाव राजा 2827, खामगांव 7149, शेगाव 2342, मलकापूर 3432नांदुरा 4808, जळगांव जामोद 3976 आणि संग्रामपूर तालुक्यासाठी 4474 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाल्याने एकाच आर्थिक वर्षात 64155 कुटुंबांना आता स्वतःचे , हक्काचे घर मिळणार आहे.

जिल्ह्याला मोठे उद्दिष्ट मिळाल्याने प्रधानमंत्री आवास योजनेची प्रतीक्षा यादी अर्ध्यावर येणार

प्रधानमंत्री आवास योजनेत एव्हढ्या मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. बुलडाणा जिल्ह्याला आतापर्यंत एवढ्या मोठ्या घरकुलांचे उद्दिष्ट कधीच मिळाले नाही. बुलडाणा जिल्ह्यातील घरकुलांची प्रतीक्षा यादी ही 1 लाख 12 हजार एव्हढी आहे. दरवर्षी कमी उद्दिष्ट प्राप्त होत असल्याने प्रतीक्षा यादी हळूहळू कमी होत होती. या वर्षी पहिल्यांदाच मोठी उद्दिष्ट प्राप्ती झाल्याने प्रतीक्षा यादी अर्ध्यावर येणार आहे. त्यामुळे उर्वरित प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना पुढील वर्षी पर्यंत लाभ देऊन 100% प्रतीक्षा यादीमधील कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे असे प्रतिपादन केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले आहे.

घरकुलासाठी कुणीही आर्थिक व्यवहार करू नये
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

बुलडाणा जिल्ह्यासाठी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला प्रतीक्षा यादी प्रमाणे याचा लाभ मिळणार आहे. तालुका स्तरावरून ग्राम पंचायतस्तरावर ही थेट उद्दिष्ट दिलेले असल्याने ग्राम पंचायतीना मिळालेल्या घरकुलांच्या उदिष्टाप्रमाणे लाभार्थ्यांना लाभ द्यावा लागणार आहे. आवश्यक ती कागद पत्रे, आणि अटी व शर्तीची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील शिल्लक राहिलेल्या कुटुंबांना घरकुले मिळणार असल्याने कुणीही आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन देखील केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page