भगवान महावीर महोत्सव समितीच्या वतीने पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
मलकापूरचे आमदार संचेती यांची प्रमुख उपस्थिती...

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- भगवान महावीर स्वामी 2550 निर्वाण कल्याणक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दरबार हॉल, राजभवन, मुंबई येथे संपन्न झाला. या समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्राचे
माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी मा.आमदार श्री.चैनसुख संचेती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश,कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा,जैन अल्पसंख्याक विकास वित्त महामंडळाचे अध्यक्ष श्री. ललित गांधी,कार्यक्रम संयोजक श्री.हितेंद्र मोटा यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मा. आमदार चैनसुखजी संचेती यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भगवान महावीरांच्या अहिंसा व तत्त्वज्ञानाची आठवण करून दिली व समाजासाठी सकारात्मक संदेश दिला.