घिर्णी जि प शाळेच्या विद्यार्थ्यांचा हैदराबाद अविष्कार अभियान अभ्यास दौरा संपन्न

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-रविंद्र गव्हाळे:-मलकापुर तालुक्यातील घिर्णी येथील जि प मराठी उच्च प्राथमिक शाळेचे विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर वाटचाल सुरू असून विशेष म्हणजे एन एम एम एस या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत सतत पाच वर्षापासून जिल्ह्यात अव्वल असून याच धरतीवर समग्र शिक्षा अभियान शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत राज्याबाहेरील अविष्कार अभियान अभ्यास दौरा हैदराबाद साठी प्राविण्य प्राप्त नऊ विद्यार्थी व दोन शिक्षक श्री सुरेश उतपुरे, श्री सतीश घाटे विद्यार्थी विष्णू विनोद वनारे, सागर शालिग्राम भोपळे, ईश्वर राजू बोपले, संघर्ष मधुकर शिरसाट, कार्तिक गजानन साबे, वैष्णवी रमेश बोपले, कल्याणी भागवत गव्हाळे, मोहिनी छन्नूसिंग चव्हाण, वैष्णवी प्रकाश बोपले यांची निवड होऊन अभ्यास दौऱ्यासाठी 27 जानेवारी ला रवाना झाले.
अविष्कार अभियान अभ्यास दौरा हैदराबाद मध्ये सालारगंज म्युझियम, गोवळकोंडा किल्ला, रामोजी फिल्म सिटी, चारमिनार, चौमहाला, हुसेन सागर, एनटीआर गार्डन, बिर्ला तारा मंडळ, बिर्ला टेम्पल, स्टॅच्यू ऑफ इक्विटी, नेहरू प्राणी संग्रहालय, राष्ट्रपती निलयम भवन, तेलंगणा सचिवालय, बिर्ला प्लॅनिरोटीयम, लुंबिनी पार्क, लेजर शो इत्यादी ऐतिहासिक ठिकाणी भेटी देऊन अभ्यास दौरा एक फेब्रुवारीला पूर्ण केला.
शासनाच्या संपूर्ण खर्चातून सदर दौरा असल्याने ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही एक अविस्मरणीय सुवर्णसंधी होती. शाळेतील सर्व शिक्षकांच्या मेहनतीने शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढलेली असून जिल्हा परिषदेच्या शाळेतून दर्जेदार शिक्षण देण्याचे अविरत कार्य शिक्षक करीत आहे. गुणवंत विद्यार्थी घडत असून शासनाने त्यांची दखल घेत अभ्यास दौऱ्यासाठी निवड केल्याने सर्वांचे मनोबल उंचावले आहे. गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी श्री एन जे फाळके साहेब यांचे सतत मार्गदर्शन मिळत असल्याची प्रतिक्रिया उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री विष्णू बघेले सर यांनी दिली.
समग्र शिक्षा जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत अविष्कार अभियान राज्याबाहेरील अभ्यास अभ्यास दौरा हैदराबाद साठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, एन एम एम एस परीक्षा व इतर शैक्षणिक बाबीवर जिल्ह्यातील घिर्णी, वडोदा, चांडोळ, साखळी बुद्रुक, पिंपरी माळी, पळशी बुद्रुक, मंगरूळ नवघरे, आणि गुंधा अशा आठ जिल्हा परिषद शाळांची निवड झालेली होती.
या अभ्यास दौऱ्यासाठी विशेष अनमोल मार्गदर्शन व नियंत्रणात जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा. बाळासाहेब खरात साहेब उपशिक्षणाधिकारी मा. उमेश जैन, मा.अनिल देवकर साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी अंजली नेटके मॅडम आणि मा. अतुल देशपांडे साहेब व जयश्री पाटील मॅडम समग्र शिक्षा अभियान बुलढाणा यांच्या सहकार्याने हा दौरा पूर्ण झाला.
अभ्यास दौऱ्यातील एकूण 67 विद्यार्थी व 8 शिक्षक यांना श्री अतुल देशपांडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने सौजन्यपूर्वक बुलढाण्यातील दानशूर व्यक्तीकडून विद्यार्थी व शिक्षकांना एकसारखे दर्जेदार एकरंगी टोप्या, ट्रॅक सूट, बूट, स्कूल बॅग, मॉर्निंग किट मोफत उपलब्ध करून देण्यात आली.