मेहकर जि बुलडाणा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न…

मेहकर:- आपल बुलढाणा जिल्हा बातमी:- मेहकर जि. बुलडाणा येथे आज दिनांक ५/२/२५ रोजी बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा , मेहकर या विधासभा क्षेत्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपर्क प्रमुख प्रा श्री नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिवसेनेचे उपनेते आ श्री नितीन बापु देशमुख आ श्री सिद्धार्थ खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
याप्रसंगी आमदार श्री नितीन बापू देशमुख यांची उपनेते पदी निवड झाल्याबद्दल तसेच मेहकर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार श्री सिद्धार्थ खरात यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला सह संपर्क प्रमुख श्री छगन दादा मेहेत्रे, जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत, जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छिरे, जिल्हा समन्वयक श्री संदिप दादा शेळके, म आ जिल्हा संघटक सौ विजयाताई खडसन, सौ जिजाताई राठोड, युवासेना जिल्हा प्रमुख श्री नंदु कऱ्हाडे, उप जिल्हा प्रमुख प्रा श्री आशिष रहाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करणे, सदस्य नोंदणी करणे शाखा स्थापन करणे इत्यादी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीला शिवसेना, महिला आघाडी, युवासेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे सहसंपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, उप जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांचेसह शिवेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.