राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा बुलढाणा शहरात उद्या भव्य ऐतिहासिक युवक मेळावा…
युवक प्रादेशाध्यक्ष सुरेश दादा चव्हाण यांची आक्रमक तोफ शहरात धडाडणार...

युवकांच्या हक्कांसाठी लढा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनिष बोरकर याचे आव्हान
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा शहरात आगळावेगळा महा मेळावा भरणार आहे.तो साधासुधा नसून तो ऐतिहासिक मेळावा असणार आहे.त्यांची संपूर्ण तयारी शहरात सुरू आहे.दि 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा ग्रंथालय म्हणजेच गर्दे वाचनालय येथे असणार आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ऐतिहासिक युवक
मेळावा आणि सभासद नोंदणी अभियान उद्या बुलढाण्यात होणार आहे.विशेष या कार्यक्रमात युवक प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांची आक्रमक तोफ धडकणार असून जिल्ह्याभरातून युवकांचा प्रचंड महा जनसागर लोटण्याची शक्यता आहे.
या कार्याक्रमला मुख्य उपस्थिती मध्ये सिंदखेडराजा मतदार संघाची नवनियुक्त आमदार मनोज कायंदे,आणि नेतृत्वाची ताकद प्रदेश उपाध्यक्ष ॲड नझीरजी काझी व जिल्ह्यातील मान्यवर उपस्थितीत राहणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्ह्यातील युवकांसाठी नव्या आशा नव्या दिशांचा संकल्प केला आहे या मेळाव्यात संघटन बळकट करण्याचा निर्धार घेतला जाणार आहे
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनिष बोरकर यांचे युवकांच्या हक्कांसाठी हा लढा असे त्यांनी आव्हान केले
मनिष बोरकर यांनी युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन केले आहे हे केवळ सभा नाही तर आपल्या भवितव्याचा निर्धार आहे राष्ट्रवादी विचारधारेचा बुलंद आवाज बुलढाण्यातून उठवायचा आहे असे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनिष बोरकर यांनी सांगितले आहे.उद्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या मेळाव्याकडे आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बुलंद आवाज बुलढाणा
शहरात घुजणार आहे
हे राहणार मेळाव्याची वैशिष्टये—.
युवकांसाठी नव्या संकल्पांची घोषणा
संघटनेला नव्या उंचीवर नेण्याची रणनीती
विरोधी पक्षांच्या षडयंत्रांना तोडसावर