जिल्हाध्यक्षांनी दिला मानसिकदृष्ट्या त्रास :- अनुजाताई सावळेंचा आरोप
स्थानिक पदाधिकारी यांनी केले महा विकास आघाडीचे काम मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष...

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून निष्कासित केलेल्या जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळत जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी आपल्याला मानसिकदृष्ट्या त्रास दिल्याचा आरोप ६ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. काझी आणि प्रदेश उपाध्यक्ष टी. डी. अंभोरे यांच्यावर आरोप केले. यासंदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे दोनवेळा तक्रार केली होती. पुढील भूमिका घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अध्यक्ष अजित पवार यांना भेटण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज माझ्या वर स्थानिक पदाधिकारी आरोप करत आहे मात्र खर तर त्यांनीच महा विकास आघाडीचे काम केले आहे मात्र त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष दुर्लक्ष करत आहे.मी फक्त पदाचा राजीनामा दिला आहे पक्षाचा नाही असे अनुजा ताई सावळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.