अजित पर्व युवा जोडो अभियान अंतर्गत बुलडाणा येथे युवक मेळावा संपन्न…

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-बुलढाणा येथील गर्दे वाचनालय येथे अजित पर्व युवा जोडो अभियान अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा प्रदेश अध्यक्ष सुरज भैय्या चव्हाण व आमदार मनोज कायंदे यांच्या प्रमुख उपस्थिती युवा जिल्हा अध्यक्ष मनीष बोरकर यांनी युवा मेळाव्याचे आयोजन केले होते.
अजित पर्व युवा जोडो अभियानाची सुरुवात महाराष्ट्रातील संभाजीनगर येथून सुरुवात झाली आणि आज बुलढाणा येथे दुसरा युवकांचा मेळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवी उभारी मिळावी युवकांमध्ये नवी चेतना निर्माण व्हावी व संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी युवकांना पुढे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे काम करेल तसेच बुलढाणा जिल्ह्यात एकमेव आमदार मनोज कायंदे यांच्या रूपाने मिळाले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम भविष्यात होणार आहे.