गुरुकुल ज्ञानपीठ च्या विद्यार्थ्यांची संगीत विषयांच्या परीक्षेत गरुड झेप

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:– प्रतिनिधी भागवत गायकवाड:- अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई अंतर्गत संपन्न झालेल्या नोव्हेंबर/ डिसेंबर 2024 या सत्रातील गायन,वादन व नृत्य या विषयांच्या परीक्षांचा निकाल नुकताच घोषित झाला. त्यामध्ये गुरुकुल ज्ञानपीठ शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये गायन (प्रारंभिक) परीक्षेमध्ये सिद्धी जवंजाळ, शिवन्या लंबे, स्वर्णम वाघमारे, अर्णव नरवाडे विशेष योग्यता श्रेणी आणि वैष्णवी वाघमारे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तसेच तबला (प्रारंभिक) परीक्षेमध्ये देवाशीष चोपडे, अर्णव लडके, प्रणव गोरे, सिद्धांत वाघमारे, त्रिश्र्लोक सोळंके, दक्ष डोळे, तेजस वडगावे, राघवेंद्र मोहिते, देवेंद्र सावळे,रुद्र नरोटे हे प्रथम श्रेणीत आणि तबला (प्रवेशिका प्रथम) परीक्षेमध्ये निलय कुरुडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
सर्व गायन व वादनाच्या विद्यार्थ्यांना गुरुकुल ज्ञानपीठ चे शाळेचे संगीत शिक्षक श्री अमोल दिशागज यांनी मार्गदर्शन केले त्यासाठी शाळेचे अध्यक्ष डॉ. श्री. मधुसूदन जी सावळे साहेब, शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ.सौ.सविता मधुसूदन जी सावळे,प्राचार्य डॉ.जितेंद्र मराठे सर्व शिक्षक कर्मचारी यांनी कौतुकाची थाप देऊन सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.