सातव्या आदिवासी उलगुलान वेध साहित्य संमेलनाच्या परिसंवादात प्रशांत सोनोने यांचा सहभाग…

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) आदिवासी साहित्य आणि संवर्धन संस्थेतर्फे आयोजित सातव्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनाच्या महत्वपूर्ण परिसंवादात येथील सुप्रसिध्द छायाचित्रकार, जल जमिन जंगल चळवळीचे कार्यकर्ते तथा आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक प्रशांत सोनुने हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ९ फेब्रुवारी रोजी हरीओम सभागृहात संमेलन होणार असून प्रा. डॉ. अनुज लुगुन संमेलनाध्यक्ष आहेत. या संमेलनात ‘आदिवासींच्या उत्थानार्थ व सशक्तीकरणासाठी बिरसांचा उलगुलान आणि लोकलढा हाच निर्णायक पर्याय’ या विषयावर महत्वपूर्ण परीसंवाद होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतासह प्रमुख वक्ते म्हणून प्रशांत सोनुने यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आदिवासींच्या साहित्य व संस्कृतीचे अभ्यासक तथा आदिवासींच्या उत्थानासाठी देशपातळीवर संघर्ष लढ्यात योगदान देणारे समर्पित कार्यकर्ते म्हणून प्रशांत सोनुने यांची ओळख आहे. जल जमिन जंगल चळवळीचे ते प्रमुख शिलेदार आहेत. यापूर्वीच्या आदिवासी साहित्य संमेलनात सोनुने यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला आहे.