शिवसेना मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज संतनगरी शेगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन ….!

शेगाव ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):-शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदु काचबिंदू शस्त्रक्रियासह चष्मे वाटप व औषधी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे .
आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा समजुन संपूर्ण देशामध्ये आरोग्य सेवेचा काम करत असतानाच शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रियेसह शस्त्रक्रियेसह चष्मे आणि औषध वाटप आरोग्य शिबिराचे आयोजन 9 फेब्रुवारीला शेगाव येथे करण्यात आले आहे सईबाई मोटे उप जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे सकाळी 9 वा या नेतृत्वासने शिबिराचे उद्घाटन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला कामगारमंत्री आकाश फुंडकर आमदार आमदार संजय कुटे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील जिल्हा परिषदेचे सी ई ओ गुलाबराव खरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भागवत भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गिते शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव महिला आघाडी प्रमुख शारदा पाटील
शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु मिरगे पाटील शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ थारकर पाटील शहर प्रमुख संतोष लिप्ते उपस्थित राहणार आहे या नेत्र तपासणी शिबिरात मोफत चष्मे औषध वाटप आणि काचबिंदू मोतीबिंदू आणि लेन्स संदर्भातील शस्त्रक्रिया ही मोफत केल्या जाणार आहेत सोबतच मोफत चष्मे आणि औषधीचे वाटप करण्यात येणार आहे या शिबीरात तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे या आरोग्य शिबीराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन सईबाई मोटे जिल्हाउप रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री नाफडे आणि शिवसेना युवा सेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे ..