Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न.

बुलडाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठद्वारा संचलित मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा येथे क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. 9 फ्रेबुवारीला जिजामाता प्रेक्षगार येथे या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ.अण्णासाहेब म्हळसने यांच्या हस्ते झाले यावेळी जेष्ठ प्राध्यापक किसन वाघ यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. हे क्रिकेट सामने आर्ट्स कला वाणिज्य विभागाच्या अंतर्गत खेळल्या जाणार आहेत. खेळाडूंनी सांघिक भावनेने खेळ खेळावा असे आवाहन उद्घाटन पण कार्यक्रमात मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसणे यांनी व्यक्त केलंय.