शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबीराला नागरीकांच्या उस्फुर्त प्रतिसाद ….!
साहेबांना दीर्घायुष्य मिळो यासाठी शिवसैनिकांनी घातले गजानन महाराजांना साकड ...!!

शेगाव ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):-शिवसेनेचे मुख्यनेते , राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदु काचबिंदू शस्त्रक्रियासह चष्मे वाटप व औषधी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आल होत या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .
आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा समजुन संपूर्ण देशामध्ये आरोग्य सेवेचा काम करत असतानाच शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रियेसह शस्त्रक्रियेसह चष्मे आणि औषध वाटप आरोग्य शिबिराचे आयोजन 9 फेब्रुवारीला शेगाव येथे करण्यात आले होते सईबाई मोटे उप जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाने यांच्या उपस्थितीत झाले यावेळी युवा सेनेचे प्रदेश सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी जाधव शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू पाटील मिरगे देविदास घोपे डॉ संजय पाटील तालुकाप्रमुख रामा पाटील थारकर शहर प्रमुख संतोष लिप्ते उमेश अवचार किसान सेना प्रमुख पांडू भाऊ बरिंगे उप तालुकाप्रमुख मोहन लांळुरकर विभाग प्रमुख गोपाल बोरसे महिला आघाडीच्या शारदा पाटील मयूर शेजोळे जयश्री देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते . शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष लिप्ते यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयोजनाची भूमिका विशद करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून हे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सांगत आपल्या आरोग्यमंत्रीपदाचा फायदा सर्व सामान्य जनतेला मिळावा या उदात्त हेतूने भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष आणि शेगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचे ही त्यांनी सांगीतले . तर जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी आपल्या भाषणात सर्वसामान्य गरीब जनतेला मोफत आणि चांगली आरोग्य सेवा मिळावी हा दृष्टिकोन आपले मंत्री प्रतापराव जाधव यांचा अरुल्याचे सांगून जिल्ह्यातील नागरिकांना सहज आणि सुलभ आरोग्यसेवा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कामे केल्या जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले तर युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांनी आपल्या भाषणत सांगीतले की आगामी काळात लोकांना चांगली आणि मोफत आरोग्यसेवा मिळावी या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने प्रयत्न केले जात आहे बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध शिबिरांच आयोजन करून लोकांना त्यांना वैद्यकीय सेवा देण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला या शिबीरात अकोला जळगाव बुलढाणा येथील नेत्रतज्ञ डॉक्टरांच्या चमुने शिबिरामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना चष्म्यांचे वाटप केले ज्यांना डोळ्यासंबंधीचे विकार आहेत अशा रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत . या रुग्णांना शस्त्रक्रियाची तारीख ही या शिबीरात देण्यात आली हजारोंच्या संख्येत नागरिक यामी तर तपासणी शिबिरामध्ये सहभागी झाले होते
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी शिबिराच्या सुरुवातीलाच गजानन महराजांची सकाळी 11 वाजता आरती करून श्री चरणी साहेबांच्या निरोगी आयुष्याची प्रार्थना करून साकडे घालण्यात आलं….