बुलढाणा शहरात प्रभू विश्वाकर्मा जयंती तसेच मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा….

बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- देशभरात प्रभू विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. विश्वकर्मा हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे दैवत आहेत, ते सृष्टीचे निर्माते आणि शिल्पकार मानले जातात. भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका, पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत. या निमित्ताने विविध ठिकाणी पूजा, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक लोक आपल्या आणि उपकरणांची पूजा करतात, कारण विश्वकर्मा हे केवळ शिल्पकारच नाही, तर यंत्रे आणि तंत्रज्ञानाचे प्रतीक देखील आहेत.
या वर्षी योग सुध्दा चांगला आला आहे. जयंती आणि मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा एकाच दिवशी साजरा करण्यात आला आहे. चिखली रोडवरील येळगाव गावजवळ असलेल्या एमआयडीसी जवळ प्रभु विश्वाकर्मा यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. हा सोहळा संपूर्ण ३ दिवस चालला आहे. दि ८ फेब्रुवारी रोजी म्हणजेच शनिवारी श्री च्या मूर्तीची मिरवणूक व धान्याधिवास तसेच ९ फेब्रुवारी रोजी रविवारी श्री गणेश पुजन, पुण्याहवाचन, मातृकापुजन नांदीश्राध्द व देवता स्थापना, होमहवन करण्यात आले आणि १० फेब्रुवारी रोजी सोमवारी प्रभू विश्वाकर्मा यांच्या मूर्तीचे दशगात्रस्नान, प्राणप्रतिष्ठा व अभिषेक, हवन तसेच पुर्णाहुती करण्यात आले आणि महाप्रसाद देण्यात आला आहे. या ठिकाणी संपूर्ण बुलढाणा तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून समाजबांधव मोठ्या संख्याने या ठिकणी उपस्थितीत होते. एक विशिष्ठ गोष्ट म्हणजे प्रभू विश्वाकर्मा यांचे मंदिर हे अत्यंत अल्पवधीत काळात पूर्ण करण्यात आले आहे. अवघ्या तीन ते चार महिन्यात या मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अशी माहिती बुलढाणा सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ विजय खोलाडे यांनी दिली आहे.
यावेळी या ठिकाणी अध्यक्ष डॉ. विजय खोलाडे, कामगार नेते सतिश शिंदे, विश्वकर्मा पंतसंस्थाचे अध्यक्ष समाधान सुरोशे, गजानन बोराडे, हिवरा आश्रमचे उपाध्यक्ष अशोक थोराते, दयानंद थोराते, शांताराम सोनुने, विजय बोराडे, सचिन राजगुरे, योगेश राजगुरे, अकुश बोराडे, राजु जाधव या सह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थितीत होते.