निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या कारागिरांच्या सहभागाने चिखलीत आगळीवेगळी विश्वकर्मा जयंती साजरी

चिखली :आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- येथील मौनी महाराज संस्थान येथे प्रभू विश्वकर्मा जयंती तथा उद्योग दीन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद जी लांडे हे होते तर मंचावर उपस्थित जिल्हा उद्योग केंद्राची व्यवस्थापक सुनील पाटील जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे श्रीपाद परळीकर खादी ग्रामोद्योग चे गजानन पाटील चिखली तालुका कृषी अधिकारी श्री सुरडकर साहेब महिला उद्योजिका रेखा ताई बोरकर , आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक सुनील भोजवानी या कार्यक्रमाचे संकल्प व मार्गदर्शक कामगार नेते सतीश शिंदे, यावर्षीचा अर्ज समितीचे अध्यक्ष विनोद बापू देशमुख उपाध्यक्ष अझहर भाई सचिव विजय कुटे मंचावर उपस्थित होते
या प्रसंगी चिखली शहरातून विश्वकर्मा प्रतिमेचे भव्य मिरवणूक मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये बांधकाम क्षेत्रातील सर्व कार्य कारागीर बांधव हजर होते सर्वधर्मसमभाव व एकात्मतेचे प्रतीक या रॅली मधून जाणवले कार्यक्रमाच्या सुरुवातीला परदेशी करण्याची पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संकल्पना मांडणारे सतीश शिंदे यांनी सांगितले की ज्याप्रमाणे एखादी वास्तू एखादा उद्योग उभा करताना सर्व कारागीर सोबत काम करतात त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी सुद्धा कलेसोबत जोडणारे सर्व कार्य करणे एकत्र येऊन कलेचे आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा जयंतीच्या कार्यक्रमाला एकत्र आली पाहिजेत म्हणून दरवर्षीप्रमाणे आजही सर्वांना सोबत घेऊन विश्वकर्मा जयंती साजरी करत आहेत
जिल्हा उद्योग केंद्र ची महाव्यवस्थापक श्री प्रमोद जी लांडे साहेब यांनी सांगितले की विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन आपला उद्योग व्यवसाय इतर प्रत पोहोचवला पाहिजेत नवीन उद्योजकांना यातून प्रेरणा करागरांनी सुद्धा आपल्या मुलांना उद्योग क्षेत्रात पुढे आणले पाहिजेत त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र पूर्ण सहकार्य करेल हा आगळा कार्यक्रम कदाचित महाराष्ट्रातला एकमेव कार्यक्रम असेल की जो सर्व जाती धर्मातील बांधवांना सोबत घेऊन करत आहात या कार्यक्रमाची कौतुक केले
या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील कारागरांना त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून प्रभू शुगर यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये कृषी विभागाच्या योजना श्री सुरडकर साहेब खादी ग्रामोद्योग च्या योजना श्री गजानन पाटील कामगार यांनी माहिती दिली
कौशल्य विकास योजनेच्या योजनेची माहिती श्रीपाद परळीकर साहेब यांनी दिली
महिला उद्योजिका रेखाते बोरकर यांनी सांगितले की महिलांनी सुद्धा आपल्या कुटुंबा व्यतिरिक्त आपल्यामधील असलेली कला जोपासली पाहिजेत आपल्याला जी जी काही करता येते ते व्यवसायामध्ये रूपांतर केले पाहिजे त्यासाठी मी मदत करेल कामगार विभागाच्या योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते या कार्यक्रमासाठी निर्मिती क्षेत्रात काम करणारे अनेक कामगार हजर होते महिला भगिनी मोठ्या प्रमाणात हजर होत्या
आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून श्री सुनील भोजवणी यांनी कामगारांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले वॉटर फिल्टर ची वाटप स्वरूपात करण्यात आले कार्यक्रमानंतर महाप्रसादाची वाटप करण्यात आले हा आगळगाव कार्यक्रम जो सर्व कार्यक्रम सोबत घेऊन करण्यात आला याची कौतुक मान्यवरांनी केले