डॉ. विजय वाघ यांचा NIMACON 25 मध्ये सत्कार….

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाण्याचे सुप्रसिद्ध अर्थोपेडिक सर्जन डॉ. विजय वाघ, जे अवघड शस्त्रक्रियांसाठी प्रसिद्ध आहेत, यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर मॅरेथॉन धावण्यामध्येही उल्लेखनीय यश मिळवले आहे.
NIMACON 25 या National Integrated Medical Association,(NIMA) बुलढाणा शाखेद्वारे आयोजित वैद्यकीय परिषदेच्या निमित्ताने डॉ. विजय वाघ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.डॉ. वाघ यांनी १० पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) पूर्ण केल्या असून, त्यांनी ५० किमी (लोणावळा), ६५ किमी (कास पठार, सातारा) तसेच, जून २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित “कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन” मध्ये ९० किमी अंतर यशस्वीरीत्या पार केले आहे.
त्यांची ही जिद्द, शिस्त आणि अथक मेहनत प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. NIMACON 25 मध्ये त्यांच्या या अपूर्व यशाचा गौरव करण्यात आला, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.