फटाक्याच्या आतिषबाजीने व ढोल ताश्याच्या रॅलीने वेधले लक्ष..
दोन जुळ्या मुलींच्या जन्माच्या असाही स्वागत सोहळा

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- पुण्य ही विधात्या माझे पाप कर.. पण मला एका मुलीचा बाप कर या गझलकार गोपाल मापारी यांच्या ओळी मुलींच्या जन्माचे महत्व अधोरेखित करतात. मुलींचा घटता जन्मदर चिंताजनक असतांना समाजातील काही धुरणींकडून लेक वाचवा लेक वाढवा अभियान राबविल्या जात आहे. बुलढाणा शहरातील उद्योजक श्री रूपराव उबाळे पाटील यांचे चिरंजीव श्री ऋषिकेश उबाळे पाटील यांना दोन जुळ्या मुली झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा असाच होता.
१८ जानेवारी रोजी ऋषिकेश उबाळे यांना दोन कन्यारत्न झाल्यानंतर त्यांचा ९ फेब्रुवारी रोजी घरी आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात उबाळे परिवाराने या कन्याचे जोरदार स्वागत केले फटाके ढोल ताशे वाजत गाजत रॅली द्वारे आनंद साजरा करण्यात आला. या वेळी बुलढाणा येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी, मुलीचे आजोबा श्री रुपराव उबाळे वाजी सौ उबाळे तसेच उबाळे, शिंदे, साखरे, तळेकर यांच्या परिवारातील सर्व व नातेवाईक मंडळी, व तानाजी नगर येथील सर्व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
मुलींमध्ये दोन कुटुंबाचा उध्दार करण्याची शक्ती आहे. समाजाला विधायक दिशेला नेण्यासाठी महिलांनी आतोनात कष्ट घेतल्याचा इतिहास आहे. सुसंस्कृत पिढी घडविण्याची ताकद सुध्दा स्त्रियांमध्ये असल्याने दोन मुलींचा बाप झाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करु शकत नाही
– वडील ऋषिकेश उबाळे