मलकापूर रेल्वे स्टेशनवर थरकाप: – युवकाचा आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार!

मलकापूर (आपलं बुलडाणा जिल्हा बातमी) मलकापूर रेल्वे स्टेशनवर आज सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसखाली एका युवकाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे स्थानकावर अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. युवकाने अचानक रेल्वेखाली उडी मारल्यामुळे स्टेशनवर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी धक्का खाल्ला. घटनेनंतर स्टेशनवरील सुरक्षारक्षक व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. युवकाचा मृतदेह जखमी अवस्थेत रुळांवर सापडला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकारामुळे रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युवकाच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे मलकापूर रेल्वे स्टेशन हादरले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.