खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करा …!
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्षात भेट घेऊन केली मागणी... !

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):-येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये खामगाव जालना रेल्वे मार्गसाठी 50% निधीची तरतूद करावी अशी मागणी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणारा आणि मध्य व सेंट्रल रेल्वेला जोडणारा महत्वकांशी असा खामगाव जालना रेल्वे मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला आहे या रेल्वे मार्गासाठी लागणारा 50% निधीचा वाटा राज्य सरकारने उचलला असून त्या संदर्भाची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे तर आता केंद्र सरकारने सुद्धा उर्वरित पन्नास टक्के निधीची तरतूद येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये करावी अशी मागणी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज 13 फेब्रुवारी रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली या रेल्वे मार्गामुळे मध्य व सेंट्रल रेल्वे जोडल्या जाणार असून जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी 50 टक्के आर्थिक निधीची तरतूद करावी अशी विनंती ही त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे ..
रेल्वे मार्गासाठी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे सातत्याने प्रयत्न
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सन 2009 मध्ये प्रथमच निवडून गेल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जालना रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू केले होते लोकसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून हा प्रश्न लावून धरला होता त्यामुळे या रेल्वेच्या सर्वेक्षणाला मंजुरात मिळाली त्यानंतर हा रेल्वे मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात संदर्भात केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही 50% निधीची तरतूद केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याशी प्रत्यक्षात भेट घेऊन या रेल्वे मार्गावर अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून घेतली त्यानंतर आता उर्वरीत केंद्र सरकारचा 50% हिस्सा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे ..