बुलढाणासह राज्यातील 10 एकात्मिक आयुष रुग्णालयाच्या निमितीसाठी निधी मंजूर …!
केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मंत्रालयातर्गत मंजूर झाली रुग्णालये ...!

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):-राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत बुलढाणासह राज्यातील 10 ठिकाणी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एकात्मिक आयुष रुग्णालयाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या निधी मंजूरात देण्यात आली आहे त्या संदर्भातील परिपत्रक हे आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक ,राष्ट्रीय आयुष अभियानावतीने निर्गमित करण्यात आले आहे. केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मंत्रालयातर्गत ही रुग्णालय राज्यात सुरू होणार आहेत …
राष्ट्रीय आयुष्य अभियानांतर्गत सन 2023 24 व 2024 25 या आर्थिक वर्षांमध्ये महाराष्ट्रातील ठाणे , जालना , धाराशिव , नागपूर ,बुलढाणा ,छत्रपती संभाजीनगर आणि गोंदिया या सात जिल्ह्यांना राज्य वार्षिक कृती आराखडा अंतर्गत (SAAP) 50 खाटांचे आणि जळगाव , गडचिरोली ,वर्धा येथे 30 खाटांचे एकात्मिक आयुष रुग्णालय केंद्र सरकारच्यावतीने मंजूर करण्यात आली आहेत 50 खट्यांच्या रुग्णालयासाठी प्रत्येकी 1500 .00 रुपये आणि 30 खाटांच्या रुग्णालयासाठी प्रत्येकी 1050.00 रुपयांची मंजुरात देण्यात आल्याचे परिपत्रक राज्याचे आयुक्त आरोम्य सेवा व अभियान संचालक , कार्यालयाच्या वतीने आज 14 फेबुवारी रोजी निर्गमित झाले आहे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मंत्रालयांतर्गत राज्यात ही दहा एकात्मिक आयुष रुग्णालय मंजूर करण्यात आली आहेत .