संत गुरु रविदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…!
मन चंगा तो कटोती मे गंगा...!

घिर्णी ग्रामपंचायत येथे सर्व समाज बांधव तथा ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थित संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- संत गुरु रविदास महाराज यांची 648 जयंती सार्वजनिक उत्सव समिती त्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे शहरातील संत रविदास नगर येथून गुरु रविदास महाराज यांच्या प्रतीमिची मिरवणूक काढण्यात आली. गुरु रविदास महाराजांनी म्हटले होते कि, ऐसा चाहू राज मै जहा मिले सबन को अन्न छोट बडो सम बैसे रविदास रहे प्रसन्न…! याच मनी प्रमाणे या पृथ्वीतलावरील प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे प्रत्येक जण समाधानी झाला पाहिजे प्रत्येक माणूस समाधानी असला पाहिजे. गुरु रविदास महाराज हे समता बंधुता मानवतावादी व विज्ञानवादी विचारांचे संत म्हणून गुरु रविदास महाराज यांच्याकडे पाहिलं जातं गेली सहाशे अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले जे विचार आहेत ते आजही समाजाने जिवंत ठेवण्याचे काम समाजाने केलं आहे आणि प्रत्येक घराघरांमध्ये हे विचार पोहोचले पाहिजेत याच्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1953 मध्ये दिल्ली येथे गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी केली होती आणि या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु रविदास महाराज यांना अनटचेबल हा महत्त्वाचा ग्रंथ गुरु रविदास महाराज यांना अर्पण केला, क्रांतिकारी मानवतावादी विज्ञानवादी विचारवंत गुरु रविदास महाराज यांचे विचार आजही एक प्रेरणादायी विचार म्हणून समाजामध्ये ठाम आहेत जातीयवादाच्या विरोधामध्ये त्यांनी ठोस पावले उचलली आणि समाजामध्ये एकता निर्माण व्हावी यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले. जाति जाति में जाति है, जो केतन के पात, रैदास मनुष ना जुड सके जब तक जाति न जात…! याचप्रमाणे माणूस देखील जातीजातीमध्ये वाटला गेला आहे आणि जातीमध्ये वाटल्यामुळे एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होत आहेत आणि त्यासाठी माणसाने जाती-जातीमध्ये न वाटता एक मनुष्य हीच जात आहे असे गुरु रविदास महाराज यांनी सांगितले.
मलकापूर तालुक्यामध्ये तसेच शहरातील इतर प्रभागांमध्ये संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, पत्रकार तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.