पुलवामा शहीद जवान संजय सिंग राजपूत यांच्या स्मारकाला नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून आदरांजली
पुलवामा स्पोर्ट घडून आणणाऱ्या आरोपी अजून पण मोकळे खूप मोठी खेदाची बाब..:- सपकाळ

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे:-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री.हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी शहीद श्री.संजयसिंगजी राजपूत यांच्या स्मारकास अभिवादन केले यावेळी त्यांच्या सोबत धुळे ग्रामीण येथील माजी आमदार कुणाल पाटील यांनी शाहिद श्री.संजय सिंग यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मलकापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष हाजी रशीदखान जमादार,श्यामभाऊ राठी,नांदुरा बाजार समितीचे सभापती भगवान धांडे,पदमरावजी पाटील,मंगलाताई पाटील,प्रीती भगत,जावेद कुरेशी,बंडूभाऊ चौधरी,रमेशसिंह राजपूत,हिवाळे सर,उस्मान मास्टर,पुरुषोत्तम झाल्टे,प्रवीण पाटील,अनिल गांधी,ज्ञानू डांबरे,गोविंद रहाटे,सनाउल्लाखा जमादार,सोपान शेलकर,नंदूसिंह राजपूत,वाजिद खान,शिरीष डोरले,रईस जमादार,हरीष सिद्धीक सुपडू,डॉक्टर सलीम कुरेशी,साजिद खान,फिरोज खान,जाकिर मेमन,सलिम एम एस युसुफ खान,उस्मान खान,राजू जवरे,विनय काळे,राजू पाटील, बंडू चवरे,सम्यक चवरे,गोलू बांगडे,अजीज बागवान,अनिल मुंधोकार,गजूभाऊ सोनोने,विलास खर्चे, विनायक देशमुख,अनिल भारंबे,गोळीवाले काका इत्यादि उपस्थित होते.