Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

आयुष्यभर झिजलेल्या लेखणीचा ऐतिहासिकसन्मान..!बुलढाण्यात ’पत्रयोगी जीवनगौरव’ पुरस्कार ठरला भावस्पर्शी

केंद्रीय आणि राज्याचे मंत्रीसह जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती...

Spread the love

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: समाजहितार्थ पत्रकारिता करून आयुष्यभर लेखणी झिजविलेल्या पत्रकारांचा ऐतिहासिक सन्मान सोहळा आज, 16 फेबु्रवारी रोजी बुलढाण्यातील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सोत्साह पार पडला. पत्रकारितेप्रति सामाजिक कृतज्ञतेची जाणिव ठेवीत केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव आणि राज्याचे कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी उपस्थिती दर्शविली. 60 वर्षे वयावरील ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून ‘पत्रयोगी जीवन पुरस्कार’ देवून सपत्नीक सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील आमदारांनी सोहळ्याला हजेरी लावून पत्रकारांच्या सामाजिक योगदानाचा यावेळी गौरव केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे होते. सुप्रसिद्ध न्यूज विश्लेषक प्रसन्न जोशी यांची विशेष उपस्थिती होती. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आयुष मंत्री खा. प्रतापराव जाधव, राज्याचे कामगार मंत्री आ.आकाश फुंडकर, आ. संजय कुटे, आ. संजय गायकवाड, आ. धीरज लिंगाडे, आ. मनोज कायंदे, आ. सिद्धार्थ खरात, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे, अकोला उपमुकाअ समाधान वाघ, नाशिक उपमुकाअ प्रताप पाटील, व्हिडीओ प्रॉडक्शन तज्ञ प्रथमेश गोगारी, माँ जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे, आदिती अर्बनचे जनसंपर्क अधिकारी सुरेंद्र जाधव, यांची विशेष उपस्थिती होती. मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, परभणी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर, डिजीटल मिडीया परिषदेचे राज्याचे अध्यक्ष अनिल वाघमारे, उपाध्यक्ष अनिल उंबरकर, केंद्रीय सदस्य जितेंद्र सिरसाठ, धम्मपाल डावरे आदि मान्यवरही मंचावर विराजीत होते.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी केले. मागील दीड महिन्यात सिंदखेडराजापासून संग्रामपूरपर्यंत मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. कामगार मंत्री आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, आ संजय गायकवाड, सिद्धार्थ खरात, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी पत्रकारितेसमोरील आव्हाने आणि समाजात पत्रकारितेचे महत्त्व विशद केले. पत्रकारांच्या मागण्यांसाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासन अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी दिले. ‘पत्रकारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक विकास महामंडळाच्या प्रशासकीय संरचनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचेही ते म्हणाले. ‘राजकीय नेते आणि पत्रकार यांच्या सहसंबंधांवर आ. संजय गायकवाड यांनी प्रकाश टाकला. पत्रकारांच्या मागण्या शासनाकडून पूर्ण करून घेण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले. विद्याधर महाले यांनी मनोगतात म्हटले की, पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार खर्‍या अर्थाने ज्येष्ठ पत्रकारांच्या पत्रकारितेचा सन्मान आहे.

 

 या सोहळ्यात जिल्ह्यातील 87 ज्येष्ठ पत्रकारांचा आणि वृत्तपत्र वितरकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, भेटवस्तू, शाल आणि पुष्पहार, महिलेसाठी साडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. जिल्हाभरातून आलेल्या ज्येष्ठ पत्रकारांचा मान्यवरांनी गौरव केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली. जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी या सोहळ्याच्या आयोजन-नियोजन आणि संयोजनाचे कौतुक केले. कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी कार्याध्यक्ष वसीम शेख अन्वर, कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, सरचिटणीस कासिम शेख, प्रदेश प्रतिनिधी युवराज वाघ, गणेश निकम, उपाध्यक्ष रविंद्र गणेशे, सचिव शिवाजी मामनकर, महिला सेल अध्यक्ष कु. मृणाल सावळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किशोर खंदारे, सहप्रसिद्धी  प्रमुख निनाजी भगत, जिल्हा संघटक प्रेमकुमार राठोड, जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे, आरोग्य सेल कार्याध्यक्ष डॉ. भागवत वसे, शाकिर हुसैन, विभागीय संघटक रहेमत अली, बुलढाणा शहर पत्रकार संघ कार्यकारिणीचे राम हिंगे, अजय राजगुरे, ईसरार देशमुख, सुनील मोरे, समाधान चिंचोले, राहुल दर्डा, जफर शेख, सुधाकर मानवतकर, विनोद सावळे, रमेश जाधव, सैय्यद ईरफान, प्रकाश जेऊघाले, ओम कायस्थ आदिंनी विशेष परिश्रम घेतले. डिजीटल मिडीया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ, सचिव दीपक मोरे यांनीही कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी मेहनत घेतली. आभार प्रदर्शन अभिषेक वरपे यांनी केले.  

रेल्वे सवलत पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील ः ना. जाधव
यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारतर्फे पुढाकार घेत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कोरोना काळात रेल्वेने अनेक सवलती बंद केल्या होत्या. काही ठिकाणचे थांबेही बंद झाले होते. पत्रकारांसाठी रेल्वेसह विमान प्रवासात सवलत मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे ना. जाधव यांनी आश्वस्त केले. तसेच, आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून पत्रकारांच्या आरोग्य सेवेसाठीही विशेष योजना राबवली जाईल. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी पत्रकारांना रेल्वे सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी संचालनामधून केली होती, हे विशेष.

नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक – प्रसन्न जोशी
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रसन्न जोशी म्हणाले, पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपानुसार नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील पत्रकारांनी आपल्या उमेदीने दिल्लीतसुद्धा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे. ग्रामीण भागातील पत्रकारांना येणार्‍या अडचणीवर त्यांनी प्रकाश टाकला. आजच्या पत्रकारितेसमोरील समस्यांवर भाष्य करत डिजिटल पत्रकारितेत कशा संधी आहेत यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा पत्रकार संघाचा कौतुकास्पद उपक्रम – सुरेश नाईकवाडे
मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांनी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ज्येष्ठ पत्रकारांचा सपत्नीक गौरव करणे ही अभिनव संकल्पना आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात पत्रकारांच्या हक्कासाठी लढा सुरू आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने राबवलेला हा विशेष उपक्रम इतर जिल्ह्यातही घेण्यात प्रोत्साहित करण्याबाबत त्यांनी स्पष्ट केले.

लवकरच खामगाव जिल्हा : डॉ. संजय कुटे
जिल्हा पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक करून माझ्या वडिलांनीही वीस वर्ष पत्रकारिता केल्याचे हा संजय कुटे यांनी यावेळी सांगितले.  खामगाव हा नवीन जिल्हा होईल, अशी माहिती आमदार संजय कुटे यांनी दिली

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page